वाइन शॉप चा परवाना काढून देण्याची थाप मारून 50 लाखाची फसवणूक करून फरार झालेला आरोपीने दिल्लीत ज्वेलरी चे दुकान थाटले होते.सिडको पोलिसाने त्या भामट्याच्या दिल्ली मधून मुसक्या आवळल्या. दयानंद वजलू वनजे वय- 46 (रा.नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी दयानंद याने सन-2019 मध्ये शहरातील एका व्यापार्याला देशी विदेशी वाईन्स शॉप काढून देतो अशी थाप मारली होती.त्याचे राहणीमान देहबोलीला प्रभावित होऊन व्यापार्याने वेळोवेळी 50 लाख रुपये दयानंद ला दिले होते.मात्र त्या नंतर तो पसार झाला त्याच्याशी संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापार्याने पोलिसात धाव घेतली होती. निरीक्षक गिरी यांना खबर्या ने माहिती दिली की फरार दयानंद दिल्ली येथे सौंदया ज्वेलर्स नावाने दुकान चालवत आहे. या माहिती वरून सिडको पोलिसांचे पथकाने दिल्ली गाठत पटेलनगरात सापळा रचत दयानंदच्या मुसक्या आवळल्या.